"तो मी नव्हेचं!", शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

या भेटीचं वृत्त सर्वत्र पसरल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बैठकीमुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली.
"तो मी नव्हेचं!", शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेट पार पडली. या भेटीचं वृत्त सर्वत्र पसरल्यावर मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बैठकीमुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. अनेक नेत्यांना महाराष्ट्राला काय ते स्पष्ट सांगावं असं म्हणत आपली नाराजी बोलून दाखवली.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. आपण भाजप सोबत जाणार नसल्याचं पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. यानंतर देखील पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर चर्चा सुरु झाल्या आहेत. अशात आता अजित पवार यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार हे आज कोल्हापूरात ध्वाजारोहन कार्यक्रमाला आले असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी यावर थेट उत्तर दिलं.

पुण्यातील शरद पवार यांच्या सोबतच्या बैठकीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या बैठकीचं मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्यात आहे. माध्यमं अशा भेटींना प्रसिद्दी देतात. त्यातून गैरसमज निर्माण होतात. त्याठिकाणी फार काही वेगळ घडलं असं समजू नका. असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. असं अजित पवार म्हणाले. तसंच चोरडिया हे यांच्याशी आमचं दोन पिढ्यांचं नात आहे. ते पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं होते. जयंत पाटील देखील यावेली पवारसाहेबांसोबत होते. दोन पिढ्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जेवायला जाण्यात चुक काय? असं म्हणत या भेटीला राजकीय रंग देऊ नका, असं ते म्हणाले.

या भेटीतून अजित पवार बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला छोटा अपघात झाला अस अनेक माध्यमांनी सांगितलं. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी लपून गेल्याचं तुम्ही कुठे पाहिलं. मी उद्या तुमच्या घरी आल्यावर कधी निघायलं हे मी ठरवणार. मी बैठकीला गेलो हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडताना धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in