
मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. यावरुन केंद्रसरकार टीका देखील केली जात आहे. केंद्राकडून मात्र मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. अशात आता समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मणिपूर हिंसाचारावर केंद्र सरकारने केरेल्या दाव्यावर टीका केली आहे. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आली असेल तर त्याठिकाणी G20 चा कार्यक्रम घेऊन दाखवा असं आव्हान अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला केले आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशभरात G20च्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मग मणिपूरमध्ये एकही कार्यक्रमाचं आयोजन का केलं गेलं नाही. या कार्यक्रमाचा भाजपला फायदा मिळत आहे. मग भाजप या कार्यक्रमाचं आयोजन का करत नाही, टॅक्स देणाऱ्या लोकांनी त्याला स्पॉन्सर का करावं, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच मणिपूरमध्ये G20कार्यक्रम घेवून या राज्यात सर्व ठिक चाललं आहे असं जगाला सांगावं, असही अखिलेश म्हणाले.
यावेळी बोलताना अखिलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, मोदी विरोधकांच्या इंडिया आघाडीला घमंडिया म्हणत आहे. पण, खऱं तर तेच घमंडी आहेत. मोदी घराणे शाहीवर बोलतात, मग ज्योतिरादित्य शिंदे घराणेशाहीतून आले नाहीत का, योगी आदित्यनाथ हेही घराणेशाहीमुळेच मुख्यमंत्री झाले. मी फक्त दोन नावे घेतली असं म्हणत यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
खासदार हे निर्वाचित नसतात, ते निवडून येत असतात. आपण त्यांना तिकीट देऊ शकतो. मात्र त्यांना निवडून देण्याचं काम लोकचं करत असतात. भाजपने आपला कमीपणा लपवण्याचं काम करु नये. भाजपमध्ये सर्वात मोठी घराणेशाही पहायला मिळते, असंही ते म्हणाले.