बच्चू कडूंच्या विधानावर अंबादास दानवे म्हणाले, "आमच्याकडे..."

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं
बच्चू कडूंच्या विधानावर अंबादास दानवे म्हणाले, "आमच्याकडे..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत. त्यासाठी ते सुरुवातीला ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू

ऐकूण घेणार आहेत. त्यांच्या या निर्यणयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. असं असताना आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते राज्याच्या विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजून लागेल.

यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका वृत्तीवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत यावर भाष्य केलं आहे. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. काहीतरी कुरापती काढून विलंब लावला जात आहे. आता बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्यावरुन कळत की काय निर्णय द्यायचा हे आधीच ठरलं होतं की काय? पण, सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आमच्याकडे आहे. म्हणून अध्यक्षानी दिलेला निकाल हा अखेरचा नसलेस असं दानवे म्हणाले.

तसंत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीक केली आहे. ते म्हणाले की, दररोज एक असे ५३ आमदारांची बाजू विधानसभा अध्यक्ष ऐकणार आहेत. हा वेळकाढू पणा आहे. सगळ्या आमदारांची बाजू ही एकत्रच ऐकची पाहीजे. असं ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in