अंबादास दानवे यांचे भगत सिंह कोश्यारी यांना पत्र ; म्हणाले, "२१ जूनला..."

कोश्यारीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अंबादास दानवे यांनी हे पत्र लिहिलं
अंबादास दानवे यांचे भगत सिंह कोश्यारी यांना पत्र ; म्हणाले, "२१ जूनला..."

राज्याच्या सत्ता संघर्षावर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांच्या भूमिका आणि कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. कोशारी यांनी भाजप तसंच शिंदे गटाला साथ दिल्याने उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, असा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने केला जातो. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भगत सिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे.

कोश्यारीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अंबादास दानवे यांनी हे पत्र लिहले असून यात त्यांनी ४० गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली म्हणून २१ जून हा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी युनोकडे मागणी करा, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

यात पुढे म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकदा आपली भेट झाली. उद्धव ठाकरेंच्या सरकारला वारंवार जाणीवरपूर्वक त्रास देण्याचं काम तुम्ही अविरत चालू ठेवलं. ते कमी होते म्हणून दिल्लीच्या पातशहाच्या मार्गदर्शनाखाली सूर्याजी पिसाळ आणि खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचे पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पार केले. ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतलीस, असा आरोप देखील दानवे यांनी केला आहे.

या पत्रात पुढे दानवे यांनी लिहिलं आहे की, जर अशा गद्दारीने जगातील एवढ्या देशांतील जनतेने लक्ष वेधले जात असेल तर हा दिवस "जागतिक गद्दार दिन" म्हणून साजरा केला जाऊ शकतो. तो व्हावा यासाठी आपण दिल्लीच्या पातशहांमार्फत युनोकडे प्रयत्न करावे, असा टोला त्यांनी या पत्रातून हाणला आहे.

logo
marathi.freepressjournal.in