खातेवाटप ‘जैसे थे’; केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा, राजनाथ, सीतारामन, गडकरींकडे जुनीच खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळ खातेवाटपात फारसा बदल न करता ‘पुनश्च: हरि ओम’ केल्याचे दिसून येत आहे. भाजपने बहुतांश महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले असून मित्रपक्षांना दुय्यम खाती देण्यात आली आहेत.
खातेवाटप ‘जैसे थे’; केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा, राजनाथ, सीतारामन, गडकरींकडे जुनीच खाती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळ खातेवाटपात फारसा बदल न करता ‘पुनश्च: हरि ओम’ केल्याचे दिसून येत आहे. भाजपने बहुतांश महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले असून मित्रपक्षांना दुय्यम खाती देण्यात आली आहेत. अमित शहा, राजनाथ, गडकरी, निर्मला सीतारामन, जयशंकर यांना त्यांच्याकडे पूर्वी असलेली खाती देण्यात आली आहेत.

मोदी सरकारचे खातेवाटप सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता जाहीर करण्यात आले. अमित शहा यांना पुन्हा गृहमंत्री, राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री, पियूष गोयल यांना वाणिज्य मंत्री, नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्री बनवण्यात आले आहे. एस. जयशंकर हे परराष्ट्र खाते सांभाळतील. शिवराज सिंह यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मनोहर लाल खट्टर यांना ऊर्जा खाते देण्यात आले आहे. नितीन गडकरींसोबत दोन राज्यमंत्री असतील. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना आयुष व आरोग्य (स्वतंत्र कार्यभार, राज्यमंत्री) खाते देण्यात आले आहे. तर रामदास आठवलेंना कृषी व शेतकरी कल्याण खाते (राज्यमंत्री) मिळाले आहे. महाराष्ट्रातील रक्षा खडसे यांना युवा कार्य आणि क्रीडा (राज्यमंत्री) तर मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक (राज्यमंत्री) खाते देण्यात आले आहे.

कॅबिनेट मंत्री

 • नरेंद्र मोदी - पंतप्रधान, अणुऊर्जा, अंतराळ,

 • अमित शहा - गृह

 • राजनाथ सिंह- संरक्षण

 • एस. जयशंकर - परराष्ट्र

 • नितीन गडकरी - रस्ते आणि वाहतूक

 • निर्मला सीतारामन - अर्थ

 • शिवराजसिंह चौहान - कृषी, ग्रामविकास

 • जतीन राम - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

 • पियूष गोयल - वाणिज्य

 • अन्नपूर्णा देवी - महिला आणि बालविकास

 • भूपिंदर यादव - पर्यावरण

 • राम मोहन नायडू - नागरी उड्डाण

 • जे. पी. नड्डा - आरोग्य

 • सर्वानंद सोनोवाल - बंदर व नौकानयन

 • सी. आर. पाटील - जलशक्ती

 • किरेन रिजिजू - संसदीय कार्य, अल्पसंख्याक

 • धर्मेंद्र प्रधान - शिक्षण

 • अर्जुनराम मेघवाल - कायदा

 • चिराग पासवान - क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया

 • प्रल्हाद जोशी - ग्राहक कल्याण

 • गिरिराज सिंह - वस्त्रोद्योग

 • ज्योतिरादित्य शिंदे - सूचना आणि प्रसारण

 • मनसुख मांडविया - कामगार

 • हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम

 • एच. डी. कुमारस्वामी - अवजड उद्योग

 • राजीव रंजन सिंह - पंचायती राज

३ कोटी घरे बांधण्यास मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान घर योजनेंतर्गत ३ कोटी घरे बनवण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

राव इंद्रजीत सिंग- सांख्यिकी व प्रकल्प अंमलबजावणी

जितेंद्र सिंह- विज्ञान-तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री

प्रतापराव जाधव- आयुष (स्वतंत्र कार्यभार) व आरोग्य राज्यमंत्री

जयंत चौधरी- कौशल्यविकास, शिक्षण राज्यमंत्री

राज्यमंत्री

जितीन प्रसाद- व्यापार व उद्योग

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा

शोभा करंदाजे - राज्यमंत्री - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

शांतनु ठाकुर- बंदर-नौकानयन

रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक

कृष्णन पाल- सहकार

पंकज चौधरी- अर्थ

रामदास आठवले- कृषी व शेतकरी कल्याण

नित्यानंद राय - गृह

अनुप्रिया पटेल - आरोग्य व कुटुंब कल्याण

व्ही. सोमण्णा- जलशक्ती

चंद्रशेखर पेम्मासानी- ग्रामविकास

प्रा. एस. पी. बघेल- मत्स, पशूसंवर्धन

logo
marathi.freepressjournal.in