आणखी दाेन दिवशी आनंदाचा शिधा; श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारचा निर्णय

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे १.६८ कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
आणखी दाेन दिवशी आनंदाचा शिधा; श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे १.६८ कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच ‘आनंदाचा शिधा’ म्हणून वितरित करण्यात येणार आहे. या वितरणाकरीता येणाऱ्या ५४९.८६ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in