अंजली दमानियांचा भुजबळांना इशारा, म्हणाल्या...

समीर भुजबळ हे पत्रकार परिषद घेऊन खोट बोलले असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला.
अंजली दमानियांचा भुजबळांना इशारा, म्हणाल्या...

सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी मुंबईतील फर्नांडिस कुटुंबाचा बंगला लाटल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे. तसंच वारंवार या कुटुंबानं भुजबळांशी संपर्क साधला पण त्यांना याचे पैसे मिळाले नाही. याबाबत समीर भुजबळ हे पत्रकार परिषद घेऊन खोट बोलले असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला.

यावेळी बोलताना अंजनी दमानिया म्हणाल्या की, फर्नांडिस कुटुंबानं त्यांचं घर रहेजा बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी दिलं होतं. पण रहेजानं ते समीर भुजबळ यांना दिलं आणि तिकडं आता टोलेजंग इमारत उभी आहे. ते लाटलेलं घर आहे. समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सन २००३ साली आम्ही ते घेतलं आणि आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण फर्नांडिस कुटंबाचा जो बंगला होता तो त्यांच्या आई-वडिलांच्या नावावर होता. तो भुजबळांनी लाटला. या बदल्यात त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. त्यांना पैसे द्यायला तुम्ही कधी तयार होतात? तुम्हाला ती जागा हडप करायची होती. यासाठी तुम्ही वाट बघत राहिलात, असा आरोप देखील दमानिया यांनी केला.

मी या प्रकणात तडमडायचा आलेली नाही. तर मला या कुटुंबानं आम्हाला मदत करता अशी विनंती केल्यानं त्यांच्या वतीनं मी बोलते आहे. तुमच्यासारखे लोकं कोणत्याही पक्षात जातात भ्रष्टाचार करतात. त्यांच्या विरोधात ईडी लागते पण कारवाई होत नाही. तुम्ही अजित पवार, तटकरे सर्व सारखेच आहात, अशा शब्दात दमानिया यांनी समीर भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

समीर भुजबळ खोट बोलत आहेत

समीर भुजबळ या प्रकरणी काय वाट्टेल ती उत्तरं देत आहेत. त्यांनी सांगितलं की, ते या कुटुंबाला साडे आठ कोटी रुपये देणार होते. पण ते कसे देणार होते त्याचा खुलासा आज करुया. याबाबत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारा. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये किती बैठका झाल्या. सह्या नसताना हा व्यवहार रजिस्टर कसा झाला. हे कोणत्या रजिस्टरने केलं. तुम्ही राजकारणी असल्याने केलं आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी भुजबळांना केले आहेत.

उपोषणाचा इशारा

फर्नांडिस कुटंबाला पैसे दिले नाही मग तुम्ही तिकडे बिल्डिंग कशी बांधली? नरोना कोण आहे? त्याला पैसे दिल्याचं तुम्ही सांगतीलं. तिसऱ्या माणलाला पैसे दिलेत तर तुमचा मुर्खपणा आहे. हा परिवार १०० वेळा तुम्हाला भेटला आहे. पण तुम्ही त्यांना पैसे दिले नाहीत. आता आम्ही दोन गोष्टी करणार आहोत. पण आता आम्ही पोलिसांची परवाणगी घेणार आणि या कुटुंबासोबत तिकडे रस्तावर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा अंजनी दमानिया यांनी भुजबळांना दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in