जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

महाड येथे बुधवारी मनुस्मृती दहन आंदोलनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडल्याच्या आरोप आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

महाड : महाड येथे बुधवारी मनुस्मृती दहन आंदोलनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात महाड पोलीस ठाण्यात ॲॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आव्हाड यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला. तेव्हा मनुस्मृतीच्या पोस्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. हा फोटोही फाडला गेला. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी आपली चूक झाल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाड यांनी बिनशर्त माफी मागितली.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाड शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह एकूण २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या २३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कलमांतर्गत गुन्हे दाखल

भा.द.वि. कलम १८६० नुसार सेक्शन १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम ३७ (१), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार सेक्शन ३७ (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन १३५ या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. आव्हाड हे देशातील व राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in