बाबा बालकनाथ राजस्थानचे मुख्यमंत्री होणार? खासदारकीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण

भाजपने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह १२ खासदारांना उमेदवारी दिली होती.
बाबा बालकनाथ राजस्थानचे मुख्यमंत्री होणार? खासदारकीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण
Published on

नुकत्याच लागलेल्या पार राज्यांच्या विधानसभेच्या निकालात भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. असं असातना या राज्यात भाजपने आपल्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नसल्याने मुख्यमंत्री कोण होणार याचर्चांना उधाण आलं आहे. असं असताना राजस्थानमधील भाजपचे खासदार बाबा बालकनाथ यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे बाबा बालकनाथ हे राजस्थानेचे मुख्यमंत्री होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

भाजपने या नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत आपले केंद्रीय मंत्री आणि खासदार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांसह १२ खासदारांना उमेदवारी दिली होती. यापैकी दोन खासदारा वगळता इतर १० खासदार या निवडणुकीत विजयी झाले होते. यानंतर या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

खासदारकीचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, रिती पाठक, उदय प्रताप सिंग, नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश आहे. तर राजस्थान मध्ये किरोडीमल मीना, दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड, तर छत्तीसगडमध्ये गोमती साई वअरुण साव यांना समावेश आहे.

पाच पैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात भाजपा स्पष्ट बहुमाने सत्ता मिळाली आहे. असं असल तरी अजूनही या राज्यात भाजपने मुख्यमंत्री पदावरु सस्पेंन्स ठेवला आहे. दरम्यान, दीया कुमारी यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी भेट घेतली होती. तर आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यात भेट होणार आहे. याच बरोबर बाबा बालकनाथ यांनी देखील खासदारकीचा राजीनामा दिल्याने त्याचं नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in