
सुप्रीम कोर्टाने विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांना फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेबाबतच्या कारवाईने वेग धरला आहे. यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) मुख्यमंत्री(CM) पदावरुन पाय उतार होऊन त्या जागी अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवल्यास त्यांचे गंभीर परिणाम भारतीय जनता पक्षाला(BJP)भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे.
असं होऊ शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. पण असं झाल्यास भाजपला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कारण एकनाथ शिंदे यांचे देखील ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पदावरुन हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाहीत, असं देखील ते म्हणाले.
यावेळी कडून यांनी आरक्षणाबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण हा विषय राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आङे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार.
बच्चू कडूंनी यावेळी राज्यातील कंत्राटी नोकर भरतीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत. तर दुसरीकडे कंत्राटी नोकर भरती केली जातेय. अधिकाऱ्यांच्या कामाचं मुल्यांकन झालं का कधी? तो किती काम करतोय, तो पगाराप्रमाणे काम करतोय का? मग कंत्राटी कडून अपेक्षा काय ठेवता? स्वच्छ प्रशासन लावून कंत्राटी भरायला काहीच हरकत नाही, असं म्हणत त्यांनी कंत्राटी भरतीचं समर्थन केलं.