मंत्रीमंडळ विस्तावरुन बच्चू कडूंचं मोठ विधान ; म्हणाले, "त्या दिवशी मी..."

मंत्रीमंडळ विस्तावरुन बच्चू कडूंचं मोठ विधान ; म्हणाले, "त्या दिवशी मी..."

आता १० ते १२ ऑगस्ट दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे

महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या घटनेला आता एक वर्षाहुन अधिक काळ लोटला आहे. तरीही शिंदे गटातील अनेक नेत्यांचा अद्याप मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रीपद मिळेल आशेवर असताना, अजित पवारांसह काही आमदारांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

आता राष्ट्रवादीच्या आमदारांचा उर्वरित गट देखील सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचा उर्वरीत गट सत्तेत सहभागी झाल्यास त्या गटातील नेत्यांनाही राज्यमंत्री पदं दिले जातील, अशी देखील चर्चा आहे. आता १० ते १२ ऑगस्ट दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यावर शिंदे गट तसंच प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना, "माझं काय होईल? याची कुणीही चिंता करु नये. मी आमदार असो वा नसो किंवा मी मंत्री असो वा नसो याची मला काहीही चिंता नाही. मला मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. पण आता मी स्वत: मंत्रीपद नाकारलं आहे. त्यामुळे तो विषय आता संपला आहे. ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्या दिवशी मी अमेरिकेला जाऊन बसणार आहे."असं देखील बच्चू कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in