नवनीत राणा यशोमती ठाकूर यांच्या वादात बच्चू कडूंची उडी ; म्हणाले...

नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
नवनीत राणा यशोमती ठाकूर यांच्या वादात बच्चू कडूंची उडी ; म्हणाले...

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर निवडणूकीत प्रचार करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. यावरुन त्यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडून यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "नवनीत राणा यशोमती ठाकूर यांना २०१९ साली पैसे दिल्याचा विषय काढत आहेत. हे चुकीचं आहे. सर्वात आधी पैसे देणारा चुकीचा आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. कारण, नवनीत राणांनी सर्वांसमोर हे वक्तव्य केलं आहे. त्यांमुळे त्यांनी किती पैसे यशोमती ठाकूर यांना दिले आहेत. अथवा ठाकूर यांनी किती पैसे घेतले? याची चौकशी झाली पाहिजे", असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

काय म्हणाल्या नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर यशोमती ठाकूर यांनी प्रचार केला. तर, रवी राणांकडून ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं, अशी टीका राणा यांनी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in