"....कारण शरद पवार पंतप्रधान नाहीत", अदानींसंदर्भातील प्रश्नावर राहुल गांधी थेटच बोलले

राहुल यांनी परदेशी वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सचा हवाला देत गौतमी अदानींवर आरोप केला आहे.
"....कारण शरद पवार पंतप्रधान नाहीत", अदानींसंदर्भातील प्रश्नावर राहुल गांधी थेटच बोलले

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोळसा घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ३२ हजार कोटी रुपयांचा नवा आरोप अदानींवर केला. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

राहुल यांनी परदेशी वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सचा हवाला देत गौतमी अदानींवर आरोप केला आहे. वाढत्या वीज बिलामागे अदानी ग्रुपचा हात आहे. अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याता दर दुप्पट होतो, असा आरोप राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी इंडिया आघाडी एकत्र असून देखील तुम्ही शरद पवार गौतम अदानी यांच्याभेटीवर प्रश्न उपस्थित का करत नाहीत? असा सवाल राहुल यांना पत्रकारांनी विचारला. यावर राहुल गांधी यांनी थेट उत्तर दिलं. ते म्हणाले की, मी शरद पवार यांना प्रश्न विचारलेले नाही कारण ते भारताचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार बचाव करत नाहीत. अदानी मिस्टर मोदी आहेत आणि म्हणूनच मी मोदींना हा प्रश्न विचारला. जर शरद पवार भारताचे पंतप्रधान म्हणून बसले असते आणि अदांनींना संरक्षण देत असते तर मी त्यांना देखील हा प्रश्न विचारला असता, असं राहु म्हणाले.

इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर गौतम अदानींवर कारवाई करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर आम्ही हे नक्की करुन दाखवू फक्त अदानीच नाही तर जो कोणी ३२ हजार कोटींची चोरी करेल त्याची चौकशी केली जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in