"मी त्यांना जास्त किंमत देत नाही", आमदार रोहीत पवारांवर भुजबळांची टीका

मी १९८५ मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहीत पवार यांचा जन्म झाला असल्याचं देखील ते म्हणाले
"मी त्यांना जास्त किंमत देत नाही", आमदार रोहीत पवारांवर भुजबळांची टीका

मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमध्यामांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांना चांगलचं धारेवर धरलं. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, मी १९८५ मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहीत पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करु नका, इतिहास जाणून घ्या, असा सल्ला त्यांनी रोहीत पवार यांना दिला. यावेळी भुजबळांनी मी रोहीत पवारांना जास्त किंमत देत नसून त्यांच्या मतदार संघात जाऊन त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी त्यांनी रोहीत पवार यांना दिला.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर देखील भाष्य केलं. याविषयी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार आणि तुम्ही पवार घराणे यांनी ठरवू साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. तसंत मी काही त्यांना जास्ती किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

शरद पवार यांनी नुकतीच भुजबळ यांच्या येवला मतदार संघात जाहीर सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी नाव न घेता अनेकांवर निशाणा सांधला. यानंतर येवल्यात अजित पवार यांच्या गटाकडून उत्तर सभा घेणार का? या प्रश्नावर त्यांनी लवकरच या त्याचं नियोजन केलं जाईल, असं सांगितलं. यावेळी सद्या आमदारांच्या भेटी गाठी सुरु असून सुरुवातीला पवारांबरोबर होते, ते आता परत येत असून त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याचं काम सुरु असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in