मनोज जरांगे यांचा मोठा दावा; म्हणाले, "छगन भुजबळ भाजप...."

भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वाद आरक्षणावरुन राजकीय रुप धारण करताना दिसून येत आहे
मनोज जरांगे यांचा मोठा दावा; म्हणाले, "छगन भुजबळ भाजप...."

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि ओबीसी नेते तथा मंत्री छनग भुजबळ यांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता हा वाद आरक्षणावरुन राजकीय रुप धारण करताना दिसत आहेत.

आता जरांगे यांनी एका नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे-पाटील हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी हा दावा केला आहे.

मनोज जरांगे यानी केलेल्या दाव्याने नवं राजकारण तापण्याची शक्यता आहे. "छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे." असा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. आज नेवासा येथे जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेआधी मनोज जरांगे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने सभेच्या ठिकाणी सर्वांच लक्ष वेधलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in