विदर्भाच्या बड्या नेत्याने परमवीस सिंग यांना हाताशी मला १४ महिने आतमध्ये टाकलं", अनिल देशमुख यांना रोख नेमका कुणाकडे?

देशमुख यांनी नाव न घेता विदर्भातील एका बड्या नेत्यावर आरोप केला
विदर्भाच्या बड्या नेत्याने परमवीस सिंग यांना हाताशी मला १४ महिने आतमध्ये टाकलं", अनिल देशमुख यांना रोख नेमका कुणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अॅंटिलिया प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी देशमुख यांनी नाव न घेता विदर्भातील एका बड्या नेत्यावर आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आमच्या बाजून निर्णय लागले. निवडणूक आयोगाने जर दबावाखाली काम केलं तर वेगळा निर्णय लागू शकतो. माझ्याबाबतीत तसाच अन्या झाला. मला १४ महिने जेलमध्ये राहावं लागलं, असं देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेला परमवीर सिंह आयुक्त होते. मुकेश अंबानींच्या घरासमोरील गाडीत स्फोटकं ठेवली आणि त्यानंतर गाडीच्या मालकाची हत्या केली गेली. परमवीर सिंह आणि वाझे यांचा त्याच्यात हात होता. गृहमंत्री असल्यामुळे मी त्यांची बदली करुन त्यांना सस्पेंड केलं. तर वाझेला सरकारी नोकरीतून निलंबीत केलं.

ते पुढे म्हणाले की, हे दोघे नाराज झाले होते. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते जे की विदर्भाचे आहेत. त्यांनी परमवीर सिंहांना हाताशी धरुन माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. हायकोर्टात खटला गेल्यानंतर कोर्टाने त्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केल्याचं हायकोर्टात स्पष्ट झालं.

परमवीर सिंह यांना कोर्टाने अनेकदा बोलावलं होतं. सहा समन्स काढूनही ते हजर झाले नाहीत. शेवटी त्यांचं पकड वॉरंट काढळं. मग कुठे परमवीर सिंह यांनी कोर्टात शपथपत्र देत माझ्याकडे पुरावे नाहीत. केलेले आरोप ते ऐकीव माहितीवर होते, असं म्हटलं. परंतु त्यामुळे मला १४ महिने आतमध्ये राहावं लागलं, अशी खंत देशमुख यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी विदर्भातील बड्या नेत्याचं नाव घेतल्याने चर्चांना उधान आलं आहे. अनिल देशमुख यांचा नेमका रोक कोणाकडे होता याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in