लालूंवर अटकेची टांगती तलवार?

खासदार आणि आमदारांवर खटला चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी महेंद्र सैनी यांनी लालू यादव यांच्याविरोधात कायमस्वरूपी वॉरंट जारी केले, असे विशेष सरकारी वकील अभिषेक मेहरोत्रा यांनी सांगितले.
लालूंवर अटकेची टांगती तलवार?

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी १९९५-९७ मध्ये कथित बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या विरोधात कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केले. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून शनिवारी त्यांच्या अटकेबाबत तर्कवितर्क सुरू होते.

या प्रकरणाची नोंद दरगंज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती आणि त्यात २३ आरोपी होते. त्यात लालू यांचे नाव फरार म्हणून घोषित केले होते. जामीनपात्र किंवा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर ती व्यक्ती न्यायालयात हजर राहिली नाही तर कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केले जाते. खासदार आणि आमदारांवर खटला चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी महेंद्र सैनी यांनी लालू यादव यांच्याविरोधात कायमस्वरूपी वॉरंट जारी केले, असे विशेष सरकारी वकील अभिषेक मेहरोत्रा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in