अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजपच; विधानसभेच्या ६० पैकी ४६ जागांवर विजय

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत रविवारी भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. राज्य विधानसभेच्या ६० जागांपैकी ४६ जागा पटकावून बहुमताने भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आला आहे.
अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजपच; विधानसभेच्या ६० पैकी ४६ जागांवर विजय
Pema Khandu/ X
Published on

इटानगर : अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत रविवारी भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. राज्य विधानसभेच्या ६० जागांपैकी ४६ जागा पटकावून बहुमताने भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ५० जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. उर्वरित १० जागा भाजपने अगोदरच बिनविरोध पटकावल्या होत्या. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपने २०१९ मध्ये ४१ जागा जिंकल्या अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजपच

होत्या. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच जागांवर विजय मिळविला असून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) पक्षाने दोन जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीन, अपक्षांनी तीन आणि काँग्रेसने एक जागा पटकावली आहे.

अरुणाचलच्या जनतेचे मोदींनी मानले आभार

भाजपवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्याला अधिक प्रगतिपथावर नेण्यासाठी भाजप अधिक जोमाने काम करील, असे मोदी यांनी म्हटले आहे. जनतेने विकासाच्या राजकारणाला मतदान केले आहे, असे मोदी यांनी म्हटले असून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला तीन जागा

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने येथे पाय रोवले. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे निवडून आले आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण १५ उमेदवार उभे होते. यापैकी तीन उमेदवार निवडून आले तर एक उमेदवार केवळ २ मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार २०० मतांनी पडला.

logo
marathi.freepressjournal.in