भाजपने 'इंडिया' आघाडीला डिवचलं ; ट्विट करत दिला सल्ला

'इंडिया आघाडी'ची (I-N-D-I-A Alliance) तिसरी बैठक ३१ डिसेंबर(गुरुवार) आणि १ सप्टेंबर (शुक्रवार) मुंबईत पार पडणार आहे.
भाजपने 'इंडिया' आघाडीला डिवचलं ; ट्विट करत दिला सल्ला
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी संघटनात्मक मोठ बांधली आहे. विरोधकांच्या या आघाडीला 'I-N-D-I-A' असं नाव देण्यात आलं आहे. 'इंडिया आघाडी'ची (I-N-D-I-A Alliance) तिसरी बैठक ३१ डिसेंबर(गुरुवार) आणि १ सप्टेंबर (शुक्रवार) मुंबईत पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ट्वटकरत विरोधकांच्या या आघाडीवर टीका केली आहे.

या ट्विटमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हॉलिवूडच्या प्रसिद्ध सायन्स फिक्शन फिल्म 'टर्मिनेटर'शी केली आहे. भाजपने ट्विट करत म्हटलं आहे की, "टर्मिनेटर मेहमीच जिंकतो. मोदी २०२४ मध्ये परत येणार आहेत" भाजपने म्हटलंय की, विरोधकांना वाटतय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदींचा पराभव करु शकती. मात्र, विकोधक केवळ स्पप्न पाहात आहेत. त्यांनी ते खुशाल पहावं. मात्र, टर्मिनेटर नेहमीच जिंकत असतो. त्याच प्रमाणे २०२४ मध्ये मोदी पुन्हा परत येणार आहेत.

भाजप कडून करण्यात आलेल्या या टीकेवर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून कोणतही उत्तर आलेलं नाही. विरोधी पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतो ते पाहण महत्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in