भाजप नेत्याचा मोदींना घरचा आहेर ; चीन मुद्यावरुन केलं लक्ष्य

विरोधक नेहमीच चीनच्या मुद्यावरुन केंद्रातील मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करतात.
भाजप नेत्याचा मोदींना घरचा आहेर ; चीन मुद्यावरुन केलं लक्ष्य

लडाख येथील सीमेवरुन भारत आणि चीन यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. दोन्ही देशांनी यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. विरोधक नेहमीच चीनच्या मुद्यावरुन केंद्रातील मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. याताच आता भाजप नेत्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी चीन मुद्यावरुन पंतप्रधान मोदींनाच लक्ष केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची टीका केली आहे. पंतप्रधान हे भारतातील विरोधी पक्षांवर हल्ला करतात. मात्र, चीनचं नाव घेताच त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे. तीनचे आमच्या हजारो चौरस किमी जमिनीवर कब्जा केला आहे. यावर पंतप्रधान मोदी अजूनही एक शब्दही बोलू शकत नाहीत, या शब्दात स्वामी यांनी निशाणा साधला.

मोदी आणि परराष्ट्र मंत्र्यांवर केली टीका

चीनच्या मुद्यावर सुब्रमन्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चीनने ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवलं आहे. दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली आहे. परराष्ट्र मंत्री यांचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या मालकांची भाषा बोलतात, अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

एकेकाळचे जनता दलाचे मोठे नेते असलेल्या सुब्रमन्य स्वामी यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांनी प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केला. यानंतर भाजपकडून त्यांना राज्यसभेचं तिकीटही देण्यात आलं. स्वामी यांचा कार्यकाळ संपल्यावर मात्र भाजपकडून पुन्हा त्यांना राज्यभेवर पाठवण्यात आलं नाही.

logo
marathi.freepressjournal.in