भाजपने मागितली अजित पवारांची माफी ; म्हणाले, "अजित पवारांनी... "

यावेळी गोपीचंद पडळकरांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न विचारला असता...
भाजपने मागितली अजित पवारांची माफी ;  म्हणाले, "अजित पवारांनी... "

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंड पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. पडळकरांविरोधात अजित पवार गटाकडून राज्यभर आंदोलन केलं जात होतं. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माफी मागितली आहे. अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मनाने माफ करावं, असं देखील ते म्हणाले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजप त्याचं कधीही समर्थन करणार नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कत राज्य आहे. आपलं एखाद्याशी पटत नसले. किंवा महायुतीत असून आपले विचार वेगळे असतील. तुमचे मतभेद असतील. पण मनभेद तयार करुन व्यक्तीगत टीका-टिप्पणी करणं हे राज्याच्या संस्कृतीला धरुन नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर अजित पवारांबद्दल जे बोलले त्याबद्दल मी सुद्दा दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.

यावेळी गोपीचंद पडळकरांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न विचारला असताना, ते म्हणाले की, यापुढे अशी वक्तव्य करु नयेत. असं आम्ही पडळकरांना सांगितलं आहे. एका जबाबदार विधानपरिषद सदस्याने अशा पद्धतीने बोलू नये. ते भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांचं मन दुखावलं आहे. त्यासाठी मी क्षमा मागतो, असं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.

logo
marathi.freepressjournal.in