मुंबईतील सर्व जागा जिंकणार;लोकसभा निवडणूक संचालन समितीच्या बैठकीत भाजपचा निर्धार

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प केलेल्या भाजपने बुधवारी मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार केला.
मुंबईतील सर्व जागा जिंकणार;लोकसभा निवडणूक संचालन समितीच्या बैठकीत भाजपचा निर्धार

प्रतिनिधी/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प केलेल्या भाजपने बुधवारी मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार केला. त्यासाठी निवडणूक रणनीती आखण्याची आणि निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्याचा निर्णयही भाजपने घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन महाविजय २०२४’ अंतर्गत मुंबई भाजप लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक बुधवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी दादर येथील पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत महायुतीच्या माध्यमातून मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.

भाजपच्या निवडणूक तयारीचा एक भाग म्हणून भाजपने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे असून आमदार अतुल भातखळकर संयोजक तर संजय उपाध्याय, आमदार सुनील राणे, अमित साटम आणि योगेश सागर यांना सहसंयोजकपदाची बाबदारी देण्यात आली आहे.त्याचबरोबर विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले असून, त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. बूथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करून यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. बुधवारी पहिल्यांदा संयोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर या समितीच्या कोअर समितीने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचा त्या मतदारसंघाचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

या बैठकीला मंत्री आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पूनम महाजन, लोकसभा निवडणूक संचालन समितीचे संयोजक अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in