‘राम’ही निवडणूक रिंगणात; ‘रामायण’फेम अरुण गोविल मेरठमध्ये, तर कंगना ‘मंडी’त

भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह, अश्विनी चौबे यांच्यासह खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले आहे, तर काही मतदारसंघात उमेदवार बदलले आहेत.
‘राम’ही निवडणूक रिंगणात; ‘रामायण’फेम अरुण गोविल मेरठमध्ये, तर कंगना ‘मंडी’त

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी भाजपने १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. ‘रामायण’ मालिकेतील ‘राम’ अरुण गोविल यांना मेरठमधून, तर वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावतला ‘मंडी’त उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र येथून, तर बेगुसराय येथून विद्यमान मंत्री गिरीराज सिंह यांना तिकीट मिळाले आहे. भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह, अश्विनी चौबे यांच्यासह खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले आहे, तर काही मतदारसंघात उमेदवार बदलले आहेत. झारखंडच्या दुमका मतदारसंघात यापूर्वी सुनील सोरेन

यांचे तिकीट कापून सीता सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. बिहारच्या बेगूसराय येथून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांना पाटलीपुत्र, रविशंकर प्रसाद यांना पटना साहिब, पूर्व चंपारण येथे माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह, विवेक ठाकूर यांना नवादा, नित्यानंद राय यांना उजियारपूर मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे.

भाजपने उत्तर प्रदेशातील १३ आणखी उमेदवारांची यादी जाहीर केली. आतापर्यंत उत्तर प्रदेशात ६४ उमेदवारांची घोषणा झाली आहे. मित्रपक्षांना सीट दिल्यानंतर भाजप स्वत: ७५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बरेलीतून छत्रपाल गंगवार, हाथरस येथून अनुप वाल्मिकी यांना तिकीट दिले आहे.

राजस्थानातील ७ उमेदवार जाहीर

राजस्थानात आतापर्यंत भाजपने २२ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी १५ तर आता ७ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी तीन मतदारसंघातील जागांची घोषणा बाकी आहे.

राहुल गांधींविरुद्ध के. सुरेंद्रन

वायनाड येथे राहुल गांधी यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना तिकीट दिले. भाजपने आतापर्यंत २९१ मतदारसंघातील उमेदवार घोषित केले आहेत.

महाराष्ट्रातील तीन उमेदवार घोषित

भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूरला राम सातपुते, भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोलीतून अशोक नेते यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने महाराष्ट्रात आत्तापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in