भाजपची राज ठाकरेंना ऑफर? बावनकुळेंनी दोन वाक्यात विषय संपवला

राज यांनी आपल्याला भाजपाने ऑफर दिली असल्याचं सांगितलं. आपण मात्र अजुन कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचलो नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं
भाजपची राज ठाकरेंना ऑफर? बावनकुळेंनी दोन वाक्यात विषय संपवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर आल्याचं विधान केलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं. आता यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी फक्त दोन वाक्यात हा विषय संपवला आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक १४ ऑगस्ट रोजी पार पडली होती. या बैठकीला पक्षाने महत्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज यांनी आपल्याला भाजपाने ऑफर दिली असल्याचं सांगितलं. आपण मात्र अजुन कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचलो नसल्याचं ते म्हणाले. असं असलं तरी भाजपने अजित पवार यांना आधिच सोबत घेतलं आहे. शिंदे देखील त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे अद्याप आपण कोणताही निर्णय घेतला नसल्याचं ते म्हणाले.

यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बानवकुळे यांना विचारलं असता त्यांना फक्त दोन वाक्य बोलून या विषयावर बोलण्याचं टाळलं आहे. चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले की, "मला वाटत किमान आज राजकीय बोलू नये. राज ठाकरेंसह महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत." असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं तुर्तास टाळलं.

राज यांनी केलेल्या दाव्यावर पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीा अजित पवार यांना विचारणा केली. यावर अजित पवार यांनी "हे राज ठाकरे बोलले आहेत. मी सांगितलेलं नाही. राज ठाकरेंना भाजपने ऑफर दिली असेल, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्यावर मी बोलणार नाही. भाजपने ज्याला ऑफर दिली तो त्याचा आणि भाजपाचा विषय आहे. मी त्यात नाक कशाला खुपसू." असं अजित पवार म्हणाले. तसंच "माझ्याशी संबंधित काही प्रश्न किंवा राज्य सरकारशी संबंधित असणारे प्रश्न असतील तर जरुर विचारा", असं देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in