राऊतांच्या ट्वीटला भाजपचं उत्तर; म्हणाले, "हा कोणता ब्रँड?"

राऊतांच्या ट्वीटला भाजपचं उत्तर; म्हणाले, "हा कोणता ब्रँड?"

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कनिने खेळत असल्याचा दावा करत याबाबतचा फोटो ट्वीट केला. यानंतर हा फोटो गंभीर असून या फोटोची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण कधीच जुगार खेळलो नाहीत. असं म्हणत महाराष्ट्र भाजपने संजय राऊत यांच्या ट्वीटला स्पष्टीकरण दिलं आहे.

१९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, VENESHINE.साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असं प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्वावादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडलं कोठे? ते तेच आहेत ना? म्हणतात फॅमिलीलाठी मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाही. मग ते नक्की काय करत आहेत. त्यांच्या टेबलावर मारुती स्त्रोत आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे. असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊत यांच्या ट्वीटला भाजपचा उत्तर

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटला भाजपने उत्तर दिलं आहे. भाजपने उत्तर देताना आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतील फोटो ट्वीट केला. यात त्यांनी आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे, असा प्रश्न केला आहे. भाजपने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही.

फोटोची सीबीआय चौकशी करा - नाना पटोले

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोल म्हणाले, भाजपचे प्रांताध्यक्ष कसिनो खेळतानाचा एक फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला आहे. हा फोटो गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे राज्य दिवाळखोरीत निघतंय. कंत्राटदारांना पैसे मिळत नाही म्हणून ते वांवार संपावर जात आहेत. राज्याची तिजोरी खाली आहे. मग भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे एवढा पैसा आला कुठून, असं म्हणत त्यांनी या फोटोची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in