"दादागिरी भाजप सरकार चालू देणार नाही", भाजपचा अमित ठाकरेंना इशारा

तीन मिनिटे गाडी थांबवल्यानंतर अमित ठाकरे यांनी १० मिनिटे थांबवल्याचं सांगून कार्यकर्त्यांना टोल फोडण्यास भाग पाडलं, असं भाजपने या व्हिडिओत म्हटलं आहे.
"दादागिरी भाजप सरकार चालू देणार नाही", भाजपचा अमित ठाकरेंना इशारा

मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन परतत असताना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गोंदी टोलनाक्यावर त्यांचं वाहन अडवण्यात आलं. या कारणावरुन संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. या प्रकरणावरुन आता भाजपने अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. टोल फोडणं म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने मनसे आणि अमित ठाकरे यांना लगावला आहे.

भाजपा महाराष्ट्राच्या ट्विटर अकाउंडवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असू त्यातून अमित ठाकरेंवर निशाणा साधला गेला आहे. "हे भाजप सरकार असून दादागिरी चालू देणार नाही", असा इशारा या व्हिडिओच्या माध्यामातून देण्यात आला आहे.

व्हिडिओत नक्की काय आहे?

भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिीओत म्हटलं आहे की, "राज ठाकरे आणि टोल नाका यांचं जुनं नातं महाराष्ट्राला माहिती आहे. त्यात सिन्नरमधील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी तीन ते साडेतीन मिनिटे थांबवण्यात आली. फास्टटॅग संबंधी कारणामुळे गाड्या अडवण्यात येत होत्या. यामुळे अमित ठाकरे यांचीही गाडी थांबवण्यात आली. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली."

"अमित ठाकरेंना याबाबत समजल्यावर त्यांच्या तोंडावरील असूरी आनंद त्यांना लपवता आला नाही. अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना खोट विधान केलं. तीन मिनिटे थांबवल्यानंतर १० मिनिटे थांबवल्याचं सांगून कार्यकर्त्यांना टोल फोडण्यास भाग पाडलं", असं भाजपने या व्हिडिओत म्हटलं आहे.

"कर्तव्य बजावत असताना विचारपूस करणं ही टोल नाका कर्मचाऱ्यांची चूक नक्कीच नव्हती. पण, मनसे कार्यकर्त्यांचा आतेतायी त्यांनाच भोवला. लक्षात ठेवा, हे जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एकासाठी किंवा त्यांच्या मुलासाठी वेगळे नियम पाळले जाणार नाही. तसं केलं तर प्रमाणिकपणे टोल भरणाऱ्या प्रत्येकाची प्रतारणा होईल, ते आम्हाला मान्य नाही", असा इशारा भाजपकडून आमित ठाकरे यांना देण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांना याबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्व विचारल्यास त्यांनी "साहेबांमुळे ६५ टोल नाके बंद पडले, तर माझ्यामुळे त्यात एकाची भर पडली", असं विधान केलं. त्यांच्या या विधानाचा देखील भाजपने खरपूस समाचार घेतला आहे. "अमित ठाकरे हा टोलनाका बंद पडला नाही. तुम्ही नियमाप्रमाणे टोल भरला नाही. मात्र, आमचं सरकार ही दादागिरी चालू देणार नाही", असा इशारा भाजपाने अमित ठाकरे यांना दिला आहे. यावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in