मांसाहार करुन केसीआर सोलापूरच्या दिशेने? अमोल मिटकरींच्या टीकेवर बीआरएसकडून स्पष्टीकरण

बीआरएसने मात्र मिटकरी यांचा आरोप फेटाळून लावला आहे
मांसाहार करुन केसीआर सोलापूरच्या दिशेने? अमोल मिटकरींच्या टीकेवर बीआरएसकडून स्पष्टीकरण

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावर आले आहेत. येताना त्यांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि नेत्यांना सोबत आणलं आहे. केसीआर हे आपल्या बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रात प्रसार करत आहेत. याचा काँग्रेसह इतर पक्षांनी देखील धसका घेतला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर त्यांच्या मांसाहार भोजनाजी बाब पुढे करुन निशाणा साधला आहे. बीआरएसने मात्र मिटकरी यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळाने हैदराबादहून पंढरपूरच्या वारीत असताना वाटेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे थांबून मांसाहारी भोजनाचा बेत आखला हा प्रकार शोभनीय आहे का? असा सवाल केला आहे. यावेळी मिटकरी यांनी वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. पंढरपूरला वारीसाठी येताना दहा हजार वेळा विचार करा. पंढरीची वाही पवित्र असून असं वागण्याने अपवित्र करु नका. अशा शब्दात केसीआर यांच्यावर टीका केली होती. यावेळी मिटकरी यांनी मांसाहाराची छायाचित्रे देखील ट्विटरवर शेअर केली आहेत.

बीआरएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी मात्र अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. महाराष्ट्रात केसीआर यांच्या पक्षाचे तुफान आलं असल्याने येथील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांची पोटदुखी सुरु झाली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक चिखलफेक करण्यात येत असल्याचं माणिक कदम यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in