कॅबिनेट मंत्री सुरेश गोपी यांचा राजीनाम्याचा इन्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच कॅबिनेट मंत्री सुरेश गोपी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली.
कॅबिनेट मंत्री सुरेश गोपी यांचा राजीनाम्याचा इन्कार
PTI

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच कॅबिनेट मंत्री सुरेश गोपी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. केरळमध्ये सुरेश गोपी हे खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आले. त्यामुळे त्यांना मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले.

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होण्याची वाट पाहण्यापूर्वीच केरळचे भाजपचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यांना मंत्रिपद नको असल्याचे वावड्या उठल्या. परंतु, या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in