Chhagan Bhujbal: "आमची परिक्षा घेऊ नका. आम्हीही...", छगन भुजबळ यांचा इशारा

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांचं नाव न घेता त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.
Chhagan Bhujbal: "आमची परिक्षा घेऊ नका. आम्हीही...", छगन भुजबळ यांचा इशारा

राज्यात आरक्षणाचा विषय सुरु असतानाच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या, असं मत छगन भुजबळ याचं आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजाला आरक्षण जाहीर करावं, आमचं आम्हाला द्या, आमच्या ताटात कोणाला वाटेकरी होऊन देऊ नका, दबलेल्या-पिचलेल्या लोकांना वर आणण्याची आमची भूमिका आहे. तुम्ही आमची परीक्षा बघू नये, आम्ही देखील लढू शकतो. यासाठी ओबीसी जातीची जणगणना करा मग आमची ताकद कळेल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला आहे.

शहापूर तालुक्यातील वालशेत (जि. ठाणे) येथे ओबीसी आरक्षणासाठी भरत निचिते यांनी २६ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी निचिते यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेऊन आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच भुजबळ यांच्या उपस्थितीतच हे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आलं. भुजबळ पुढे म्हणाले आहे की, आरक्षण देणं म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तसंच कोणाचीही लायकी काढून आपण मोठं होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे देखील ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाचे होते, असा दाखला देत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांचं नाव न घेता त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

येणाऱ्या अधिवेशनात ओबीसी जातगणना करण्याचा ठराव घेण्यात येईल, असं आश्वासन दिल्यावर भरत निचिते यांनी उपोषण सोडलं आहे. ओबीसी जातगणनेचा ठराव संमत न झाल्यास अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही भरत निचिते यांनी या वेळी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in