मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना थेट इशारा ; म्हणाले, "ओबीसंमध्ये संभ्रम..."

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याचा विरोध दर्शवला होता. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. असं छगन भुजबळ म्हणाले होते.
मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना थेट इशारा ; म्हणाले, "ओबीसंमध्ये संभ्रम..."
Published on

जम्मू काश्मीर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. असं असलं तही राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत देखील सर्व काही आलबेल अजिबात नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याचा विरोध दर्शवला होता. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. असं छगन भुजबळ म्हणाले होते. याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत पाकिस्तानच्या सिमेवरुन चांगलाच समाचार घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. के म्हणाले की, ओबीसी समजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करु नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणाताही अन्याय होणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन महायुतीत महाभारत सुरु असल्याचं दिसून येत आहे. भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शंभूराज देसाईंनी हल्लाबोल केला आहे. तर भुजबळांचं वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीप्रमाणे असल्याचं सांगत भाजप प्रदेशांकडून समर्थन देण्यात आलं आहे. तर समोरुन एन्ट्री मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्याने ओबीसी आरक्षणात शिरण्याचा डाव आहे. या भुजबळांच्या वक्तव्याला मंत्री शंभूराज देसाईंनी विरोध केला आहे. भडक वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याची भुजबळांची सवय आहे, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. अजित पवार यांनी यात लक्ष घालावं, असं आवाहन देखील देसाईंनी केलं आहे. यावरुन मराठा आरक्षणानरुन युतीत एकमत नसल्याचं दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in