राज ठाकरेंनी घेतलेल्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २५ मिनीटे स्वतंत्र राजकीय चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे
राज ठाकरेंनी घेतलेल्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

राज्यात सुरु असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली. अनेक कार्यकर्त्यांनी त्या संदर्भातील पोस्टर देखील लावले. सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे, संजय राऊत अशा बड्या नेत्यांनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.

यानंतर मनसे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे मुख्यप्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आलं होतं. दोघांच्या भेटीने नवीन काही समिकरणे जुळून येथील का? याबाबत देखील तर्क वितर्क लढवले जात होते.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या राज ठाकरे यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न तसंच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात स्थानिकांचे प्रश्न आणि सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच राज ठाकरे यांनी सांगितलेल्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असं शिंदे यांनी राज यांना सांगितलं. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २५ मिनीटे स्वतंत्र राजकीय चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in