नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय माहाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णाच्या मृत्यूंमध्ये १२ नवजात बालाकांचा देखील समावेश होता.. या बालमृत्यूवरुन विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही दखल घेतली. याता पार्श्वभूमीवर भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी एक गंभीर आरोप केला आहे. यावरुन नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रा वाघ यांच्यावर या वक्तव्याप्रकरणी विरोधकांकडून टीका केली जात आहे. गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नसल्याचा गंभरी आरोप वाघ यांनी केला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नवाजात बालकाच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर बोलताना चित्रा वाघ यांना म्हणाल्या की, छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले. त्यांचा व्हिडिओ मी माध्यमांना देते. गोळ्या दिल्या जातात, पण आम्ही खात नाहीत. पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही. डॉक्टरांनी या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंतुरुस्त असतं आणि तुमच्या मांडीवर खेळत असतं हे आम्ही त्यांना सांगितलं.
या प्रकरणी बोलताना चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आपण औषधं आणि पोषण आहार पुरवू शकतो. त्यांना गिळायला लाऊ शकत नाही. आशा सेविका लोह आमि इतर गोळ्या देतता. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही इथून आपल्याला बघण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.