'या' कारणावरुन एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये कोल्डवॉर सुरु, विजय वडेट्टीवार यांचा दावा

तीन तोंड तीन दिशेला आहेत. केवळ सत्तेसाठी मलिदा खायचा असेल तर ते मिळून खातात, असं देखील वडेट्टीवार म्हणाले.
'या' कारणावरुन एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये कोल्डवॉर सुरु, विजय वडेट्टीवार यांचा दावा
Published on

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वॉर रुमवरुन कोल्डवॉर सुरु झाला असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी वॉररुममध्ये बैठक घेतली. अधिकार नसतानाही अजित पवार यांनी वॉररुममध्ये ही बैठक घेतली आहे. यावरुन वडेट्टीवार यांनी घाणाघातील टीका केली आहे.

काहीही अधिकार आणि संबंध नसताना वॉररुमवरुन कोल्ड वॉर सुरु झाला आहे. कालच्या झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीतून हे सगळ्यांना कळलं. तीन तोंड तीन दिशेला आहेत. केवळ सत्तेसाठी मलिदा खायचा असेल तर ते मिळून खातात. मात्र, जनतेच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. राज्यात सगळ हास्यास्पद सुरु आहे. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. २८ मंत्री २८ जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते आणि जनतेला न्याय देऊ शकले असते. परंतु तिथे पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वाजारोहन करावं लागल आहे. हे दुर्दैवी आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्रसरकारने निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समितीत बदल केले आहेत. यावर वडेट्टीवार यांनी टीका केली. या देशातील निवडणुका निष्पक्ष, पारदर्शी पद्दतीनं होण्याासाठी सुप्रीम कोर्टाने सरन्यायाधीशांची नियुक्ती केली होती. परंतु केंद्र सरकारने यात बदल करत सरन्यायाधिशांना वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला. आता पंतप्रधानांनी मंत्र्यांचं नाव सुचवावं म्हणजे जी मंडळी त्या ठिकाणी बसणार आहेत. ज्यांची निवड निष्पक्षपणे होणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in