Congress: उत्तर भारतातून काँग्रेस हद्दापार! काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणे कोणती?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यात जमा आहे.
Congress: उत्तर भारतातून काँग्रेस हद्दापार! काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणे कोणती?
Published on

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यात जमा आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असताना देखील त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे हिंदी पट्यातून काँग्रेस हद्दपार झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

आज देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीस होत आहेत. राजस्थानमध्ये भाजप मुसंडी मारले असं बोललं जात होतं. मात्र काँग्रेस छत्तीसगडचा बालेकिल्ला राखत मध्यप्रदेशात जोरदार कमबॅक करेल असं सांगितलं जात होतं. काँग्रेसला देखील विजयाचे डोहाळे लागायला सुरुवात झाली होती. मात्र काँग्रेसचा पुरता भ्रमनिसार झाला असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगडममध्ये काँग्रेसचा दारुम पराभव होताना दिसत आहे. या दोन राज्यात झालेल्या परभावाच जास्त चर्चा होताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत दिसून येत होती. तर मध्यप्रदेशात काँग्रेस १३५ जागा मिळवेल असा दावा खुद्द राहुल गांधी यांनी केला होती. अशात काँग्रेस पराभवाची कारणे कोणती याबाबत चर्चा होताना दिसत आहेत.

काँग्रेसच्या हायकमांडला मुख्यता मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना हिंदी पट्ट्यातील राज्यात निवडणुकांपूर्वी गटबाजी आटोक्यात आणता आली नाही. छत्तीसगडमधील निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पक्षाने टीएस सिंहदेव याचं राजकीय महत्व वाढवल्याने भूपेश बघेल गट माघारी गेल्याची देखील चर्चा आहे.

पक्ष हायकमांडने निवडणुकी काही दिवस आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जारीन न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रचाराची पूर्ण रणनिती बदलावी लागली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने 'भूपेश है तो भरोसा है' असा नारा दिला होता. त्याचं कौतुक होताना दिसत होतं. मात्र नंतर हायकमांडने ही घोषणा बदलून 'काँग्रेस है तो भरोसा है', असा नारा देत निवडणुक पक्षकेंद्रीत करण्याता प्रयत्न केला होता.

राजस्थानमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचं बोललं जात आहे. अशोक गेहलोत समर्थकांच्या प्रचाराला अनेक ठिकाणी सचिन पायलट गेले नाहीत. याच बरोबर गेहलोत आणि पायलट कोणतीही संयुक्त रॅली स्वतंत्रपणे आयोजित करु शकली नाही.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपने ३ महिने आधीपासून तिकीट वाटप केली. काँग्रेस तेथे देखील मागे राहिली. तसंच अनेक बड्या नेत्यांचे तिकीट कापले होते. मध्य प्रदेशात देखील कमलनाथ आणि दिग्वीजय आमनेसामने आले होते. राजस्थानात राहुल गांधी हे तिकीट वाटपाच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक समितीच्या बैठकीतून गायब झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in