काँग्रेसने शब्द पाळला! मुख्य पाचही आश्वासनांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजुरी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
काँग्रेसने शब्द पाळला! मुख्य पाचही आश्वासनांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजुरी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाला चितपट करत काँग्रेसने स्पष्ट बहुमताकडे मजल मारली. मात्र, यानंतर कर्नाटक काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेज पाहायला मिळाली होती. अखेर काँग्रेस नेतृत्वाला डीके शिवकुमार यांची समजूत घालण्यात यश मिळाले. यानंतर शनिवार (20 मे) रोजी कर्नाटकमधील बंगळूर येथील कांतीराव मैदानात काँग्रेसचे नेते सिद्दरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांच्यासोबत काँग्रेसच्या आठ आमदारांना देखील शपथ देण्यात आली. सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

कर्नाटकात शपथविधी होऊन सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निवडणुकीत दिलेल्या पाचही मुख्य आश्वासनांची पुर्तता केल्याचे पहायला मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राहुल यांनी केलेल्या ट्विट मध्ये. 'हम जो कहते है, उसे पुरा करते है!' असे म्हणत, "पहिल्याच दिवशी, पहिल्याच कॅबिनेट मिटींमध्ये आम्ही कर्नाटकला दिलेल्या आश्वासनांना मंजुरी दिली आहे", असे सांगितले आहे.

काय होती काँग्रेसने दिलेली मुख्य पाच आश्वासने

काँग्रेसने कर्नाटच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास 'गृह ज्योती' योजनेअंतर्गत प्रत्येक घरात 200 युनीट वीज मोफत देण्यात येईल, गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला प्रत्येत महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येतील, 'युवा निधी' योजनेअंतर्गत पदवीधर तरुणांना भत्ता देण्यात येईल, 'उचित प्रयत्न' या योजनेच्या माध्यमातून कर्नाटकातील महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बसचा प्रवास मोफत करण्यात येईल, 'अन्न भाग्य' या योजनेच्या अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 10 किलो धान्य देण्यात येईल, अशी पाच मुख्य आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासानांची पुर्तता कर्नाटक काँग्रेसने पहिल्याचा कॅबिनेटमध्ये केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in