मोदी धनदांडग्यांना मदत करतात - राहुल गांधी

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी केला.
मोदी धनदांडग्यांना मदत करतात - राहुल गांधी

कोझिकोडे/वायनाड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मोजक्या धनदांडग्यांना मदत करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा येथे केला.

निवडणूक रोखे हा खंडणीचाच एक प्रकार असल्याची टीका गांधी यांनी केली आणि सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाला विशिष्ट उद्योगपतींविरुद्ध तैनात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रत्येक लहान शहरात आणि गावात रस्त्यावर धाक दाखवून काही जण खंडणी वसुली करतात, मल्याळी भाषेत तुम्ही त्याला 'कोल्ला अडिक्कल' असे म्हणता, मात्र नरेंद्र मोदी त्याला निवडणूक रोखे म्हणतात, एखादा भुरटा चोर जे रस्त्यावर करतो तेच मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात, असा आरोप गांधी यांनी केला.

ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी येतात, ते चौकशी करतात आणि अखेरीस तुम्ही आपला उद्योग अदानी समूहाला का देत नाही, असे विचारतात आणि अशा प्रकारेच मुंबई विमानतळ अदानींना बहाल करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, वायनाड येथेही गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in