काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांना 'भारत जोडो यात्रे' दरम्यान हृदयविकाराचा झटका

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले की, संतोख सिंह चौधरी यांचा फगवाडा येथील रुग्णालयात मृत्यू झाला
काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांना 'भारत जोडो यात्रे' दरम्यान हृदयविकाराचा झटका

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेला जात असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अचानक छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याने आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. संतोख सिंग यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. मात्र पुढील उपचारादरम्यान संतोख सिंग यांचा मृत्यू झाला.

भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले की, संतोख सिंह चौधरी यांचा फगवाडा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in