भाजपात येण्यासाठी हजारो कोटींच्या घोटाळ्याचे निकष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर अमरावतीतून घणाघात

ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, आज त्यांच्या फोटोखाली फोटो लावताय, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले
भाजपात येण्यासाठी हजारो कोटींच्या घोटाळ्याचे निकष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर अमरावतीतून घणाघात

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या काल पासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळ जिल्ह्यात 'पोहरा देवी' चं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दिग्रस येथे सभा घेत भाजपवर चांगलाचा घणाघात केला. आज उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावती येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना दिलेल्या मंत्रीपदावरुन चांगलचं धारेवर धरलं. ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच लोकांना सरकारमध्ये घेऊन मंत्रीपद दिल्यावरुन त्यांनी भाजपची चांगलीच खरडपट्टी काढली.

अमरावतील येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने या लोकांवर केलेल आरोप खोटे होते किंवा केवळ आणि केवळ तुमच्या पक्षात आले आणि गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले. ते सांगा, असा सवाल यावेळी भाजपला केला. तसंच त्यांनी पक्षात घेतलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडताय का? असं म्हणत का चौकश्या थांबल्या त्यांच्या? असा प्रश्न देखील उपस्थित केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनात पक्षात येण्यासाठी हजोरो कोटींच्या घोटाळ्याचे निकष असल्याचे सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "भाजपमध्ये लहान घोटाळा चालणार नाही, हजारेक कोटींचा घोटाळा असेल तर ये तुला मोठं पद देतो." असं असल्याचं सांगितलं.

तसंच त्यांनी अमरावतीतील सभेत बोलताना ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप लावले, आज त्यांच्याच फोटोखाली फोटो लावताय, अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in