"हे त्या डबक्यात कुदतील आणि तिथेच राहतील", 'इंडिया' आघाडीवर भाजप प्रदेशाध्यांची टीका

उद्या निवडणुका झाल्या तर इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेते देखील बनवता येईल एवढ्या देखील जागा येणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले
"हे त्या डबक्यात कुदतील आणि तिथेच राहतील", 'इंडिया' आघाडीवर भाजप प्रदेशाध्यांची टीका

देशभरातील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची(INDIA Alliance) बैठक आज आणि उद्या(३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) मुंबईत(Mumbai) पार पडत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे(Chandrashekhar BAvankule) यांनी या आघाडीबाबत भाकीत वर्तवलं आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठका केवळ नावापूरत्या आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर त्यांना विरोधी पक्षनेते देखील बनवता येईल एवढ्या देखील जागा येणार नाहीत, अशी खोचक टीका चंद्रशेखर बानवकुळे यांनी नागपूर येथे बोलातना केली.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, 'इंडिया' नावाच्या शब्दाला डॉट लावणे योग्य नाही. आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नाही. हा काही नवीन प्रयोग नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले. विरोधकांचा 'इंडिया' हा फुसका बॉम्ब असून त्यातून बारुद कधीच निघाला आहे. हा बॉम्ब निकामी आहे. अनेक नेते दुरावले असून त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे. आपण देशात दिसलो पाहिजे म्हणून ते बैठका घेत आहेत. जनता त्यांच्यामागे नाही, असंदेखील बावनकुळे म्हणाले.

इंडिया या आघाडीचा संयोजक कुणीही झाला तरी काहीही फरक पडणार नाही. हे त्या डबक्यात कुदतील आणि तिथेच राहतील. देशस्तरावर हे नेते काहीचं करु शकणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाला उंची देणारे आहेत. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा किंचिंत सेना असा उल्लेख केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in