तेलंगणाच्या विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्याचा भाजपकडून पराभव; कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी नावाची सर्वत्र चर्चा

जाहीर झालेल्या चार राज्यांचे निकालात काँग्रेसला फक्त तेलंगणा राज्यात अपेक्षित यश आलं आहे.
तेलंगणाच्या विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्याचा भाजपकडून पराभव; कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी नावाची सर्वत्र चर्चा
Published on

देशातील चार राज्यांच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशाचा गड राखत काँग्रेसकडून राजस्थान आणि छत्तीसगड हिसकावून घेतलं आहे. तर काँग्रेसने आपली दोन राज्य गमावली असली तरी तेलंगणात जबरदस्त विजय मिळवला आहे. तेलंगणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना विजयाचं शिल्पकार मानलं जात आहे. काँग्रेसमध्ये विजय खेचून आणताना रेवंत रेड्डी यांचा मात्र पराभव झाला आहे. तेलंगणातील कामारेड्डी विधानसभा मतदार संघात भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे.

तेलंगणा राज्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीन जणांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातील पहिलं नाव म्हणजे तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी ज्यांनी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. यातील दुसरं नाव म्हणजे तेलंगणाचे मावळते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं. सगल दोन वेळा मुख्यमंत्री असलेल्या केसीआर यांनी यावेळी सत्ता गमावली आहे. त्यांनी बीआरएसचा राज्याबाहेर प्रसार करण्याच्या नादात राज्यात दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. आणि तेलंगणाच्या राजकारणात तिसरं चर्चिलं जाणारं नाव म्हणजे कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांचं. जाणून घेऊया वेंकट रमना रेड्डी याच्याविषयी...

तेलंगणातील मकामारेड्डी विधानसभा मतदार संघात भाजपच्या कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि तेलंगणा विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे. शिक्षित नसलेले ५३ वर्षीय रमना रेड्डी यांनी बरीच संपत्ती कमावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण घोषित मालमत्ता ४९.७ कोटी रुपये असून ज्यात २.२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ४७.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ठ आहे.

logo
marathi.freepressjournal.in