महाराणा प्रताप यांच्या वंशजांचा भाजप प्रवेश

नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि राजस्थान भाजप अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महाराणा प्रताप यांच्या वंशजांचा भाजप प्रवेश
Published on

नवी दिल्ली : मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचे थेट वंशज विश्वराज सिंग मेवार यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि राजस्थान भाजप अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचप्रसंगी करणी सेना प्रमुख लोकेंद्र सिंग कवळी यांचे पुत्र भवानी सिंग करणी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

मेघवाल या प्रसंगी म्हणाले की, या दोन नेत्यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजस्थानातील आगामी निवडणुकीत होणारा बदल आहे. वारे सध्या भाजपच्या दिशेने वाहत असून काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्याचा मतदारांचा कल आहे, असे मेघवाल यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षप्रवेशानंतर दोन्ही नेत्यांनी भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. नड्डा यांनी त्यांना त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढले असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या कामाच्या झपाट्यामुळे हे दोन नेते भाजपकडे वळले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वराज सिंग मेवार यांचे वडील महाराणा महेंद्र प्रताप सिंग हे चित्तोडगढचे खासदार होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी पदयात्रा देखील काढली होती. तसेच काळवी हे आंतरराष्ट्रीय पोलो क्रीडापटू आहेत. त्यांनी पोलो खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये आता काम करायचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in