औरंगजेबबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी या विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं
औरंगजेबबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मराराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या", असं विधान केलं होतं. फडणवीस यांनी केलेल्या विधानावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच वाद झाल्याचं पहायला मिळालं. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी या विधानावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. फडणीस यांनी त्यांच्या त्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या विकासात औरंगजेब अडथळा आहे. आमच्या वक्तव्यांना अनेकदा माध्यमांमध्ये वेगळा अर्थ काढला जातो. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं स्टेटस लावायला, फोटो लावालयला, मोर्चे निघायला सुरुवात झाली. औरंगजेब तर आपला हिरो नाही. भारतीय मुस्लिमांचाही हिरो नाही. त्याचे वंशज देखील इथे नाहीत. ते टर्की मंगोल होते. या वंशजाची देशभरात किती कुटुंब निघतील? त्यांची काही मुल वगैरे नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतर अचानक इतके लोक त्याचे स्टेटस ठेवायला कसे लागले", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्यामुळेच औरंगजेबाच्या इकत्या औलादी कशा जन्माला आल्या? त्याच्या तर अवलादी नाहीत. हेतूपुरस्सर काही लोक सामाजिक सलोखा बिघडवू इच्छित आहेत. तेच लोक असे फोटो लावत आहेत. कारण भारतीय मुस्लीम आणि राष्ट्रवादी मुस्लीमांचा औरंगजेब हिरो होउ शकत नाही. यात मी काय चुकीचं बोललो. काहींनी त्यातून फक्त औरंगजेबाच्या अवलादी एवढंच काढून सांगितलं. मी कधीचं ते मुस्लीमांबाबत म्हटलं नाही", असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात आम्ही हे कसं सहन करणार? त्याने लाखो हिंदूंना मारलं, त्याच्याशी आम्ही लढलो आहेत. देशभरातील मंदिरं त्याने तोडली आहेत. छत्रपती संभाजी राजेंना त्याने ११ दिवस हालहाल करुन मारलं. एकच गोष्टीसाठी की त्यांनी धर्म बदलावा. पण त्यांनी धर्म बदलला नाही. अशा औरंगजेबाचे पोस्टर जर कुणी लावत असेल तर कसं सहन केलं जाईल? हे ठरवून केलं जातंय. दरवर्षी हे घडतंय का? सरकार बदललं आणि अचानक हे बदलालया लागलं असं नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in