मराठा आरक्षणाचे जनक हे देवेंद्र फडणवीसच; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर केलल्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाचे जनक हे देवेंद्र फडणवीसच; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं असताना आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर केलल्या भाष्यवर बावनकुळे यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

२०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याच प्रश्न तेव्हा सुटला असता, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुले म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी कायदा केला. पण, या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्प्यात होतं. तेव्हा हे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री झोपी गेले होते का? असा सवाल देखील बावनकुळे यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झालं आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम जसजसा जवळ येत आहे. तसतसा सरकारवर दबाव वाढत चालला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in