नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांचा विरोध; अजित पवारांना पत्र लिहित म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक हे आज अजित अजित पवार गटात सामिल झाले.
नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांचा विरोध; अजित पवारांना पत्र लिहित म्हणाले...

वैद्यकीय कारणावरुन जामिनावर असेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक हे आज अजित अजित पवार गटात सामिल झाले. आज सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. यावेळी नवाब मलिक कोणत्या गटात सामिल होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. सभागृहात नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनने जाऊन बसल्यावर ते अजित पवार गटात सामिल झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे नवाब मलिक यांच्यावर आरोप केल्या भाजपची मात्र चांगलीच पंचाईत झाली. भाजपनेच देशद्रोहासारखे आरोप केलेले नवाब मलिक भाजप प्रणिसत सरकारच्या बाजूला जाऊन बसल्याने भापवर टीका होऊ लागली. यावरुन उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.

सत्ता येते सत्ता जाते, पण देश महत्वाचा आहे. त्यांना देशद्रोहाचा आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे नवाब मलिक यांना महायुतीत सामवून घेता कामा नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर अल्याने, राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना लिहिलेलं पत्र

प्रति,

श्री. अजितदादा पवार,

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

आपला,

देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक यांच्यावर असेलेले आरोप

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीर रित्या हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या महिलनेने १९९९ साली सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. या द्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमन तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, सलीम पटेल याने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन नवाब मलिक यांच्या 'सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीला विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यांतून आलेल्या पैशामंधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली आहे, असा आरोप ईडीकडून नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in