शिवसेनेच्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस मौन; भाजप-सेनेत सर्व आलबेल नसल्याच्या चर्चांना उधान

याविषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शिवसेनेच्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस मौन; भाजप-सेनेत सर्व आलबेल नसल्याच्या चर्चांना उधान

आज वर्तमान पत्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सध्या या चाहिरातीची सर्वत्र चर्चा सुरु असून भाजप- सेनेत सर्व सुरळीत सुरु नसल्याची चर्चा सुरु आहे. तसेच याविषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक होती. या बैठकीनंतर ते बाहेर आले , त्यांनी माध्यम प्रतिनिधींना हात जोडले आणि ते निघून गेले. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार या आशयाची जाहिरात छापून आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचे म्हटले आहे. यावरुन आता भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून सेना- भाजपमध्ये अंतर्गत कुरबोरी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. यात कल्याण डोबिवली लोकसभा मतदार संघावरील वाद, सेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचा विषय असो किंवा अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात येणारे आरोप असोत, यावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. यात शिवसेनेने केलेल्या जाहिरातीवरुन सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेच्या मंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत आज छापून आलेल्या जाहिरातीबद्दल तसेच सेना- भाजपमध्ये सुरु असलेल्या वादावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी त्यांनी कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे., आपण एकत्रच आहोत. कानावर पडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. माध्यमांसमोर असे कोणतेही वक्तव्य करु नका ज्यामुळे युतीत खडा पडेल, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने युतीत काहीतरी कुरबोरी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in