देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालणार का? भाजपने सोपवली तीन राज्यांची जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अमुषंगाने फडणवीस तीन दिवस तीन राज्यांमध्ये सभा, यात्रा करणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालणार का? भाजपने सोपवली तीन राज्यांची जबाबदारी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडवीस यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. फडणवीस यांच्यावर तीन राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अमुषंगाने फडणवीस तीन दिवस तीन राज्यांमध्ये सभा, यात्रा करणार आहेत.

चालू (सप्टेंबर)महिन्यात देवेंद्र फडणवीस ५ ते ६ दिवस प्रचारासाठी राज्याबाहेर असणार आहेत. या महिन्यात १२,१३,१४,१८ तारखेला त्यांचा दौरा असणार आहेत. तसंच २२ आणि २३ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे इतर राज्यांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राजस्थानमध्ये पदयात्रा करणार असून जाहीर सभांना देखील ते संबोधित करणार आहेत. तर १८ सप्टेंबर रोजी त्यांचा मध्य प्रदेशात दौरा असणार आहेत. फडणवीस हे २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपच्या सुरु असलेल्या जनसंवाद यात्रेत देखील देवेंद्र फडणवीस सहभाग नोंदवतील.

या आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं. तसंच त्यांनी गोव्यात देखील आपल्या त्याची झलक दाखवून दिली होती. आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा चालणार का? हे निवडणुकांच्या निकालांनंतर स्पष्ट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in