दादा भूसेंनी घेतली आदित्य ठाकरेंची गुप्त भेट? दोन्ही नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

दादा भूसे आणि आदित्य ठाकरे यांची नाशिकमधील एका रिसोर्टवर गुप्त भेट पार पडली, अशा चर्चां सुरु होत्या.
दादा भूसेंनी घेतली आदित्य ठाकरेंची गुप्त भेट?  दोन्ही नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील गुप्त भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली. या भेटीमुळे अनेक तर्त-वितर्क लढवले गेले. आता राज्यभरात आणखी एका गुप्त भेटीची चर्चा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते दादा भूसे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. नाशिकमधील एका रिसोर्टमध्ये हे दोन्ही एकत्र असल्याने या दोघांत चर्चा झाली अशी माहिती माध्यमांतून समोर आली होती. आता या दोन्ही नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

दादा भूसे म्हणाले की, ते(आदित्य ठाकरे) एका कार्यक्रमासाठी नाशकात आले होते. त्यांच्यासोबत हजारो समाजबांधव उपस्थित होते. असं म्हणत आदित्या ठाकरे यांच्याशी भेट न झाल्याचं दादा भूसे यांनी स्पष्ट केलं. तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

दादा भूसे आणि आदित्य ठाकरे यांची नाशिकमधील एका रिसोर्टवर गुप्त भेट पार पडली, अशा चर्चा रंगत असताना त्यावर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, कोणालाही हुडी घालून भेटायला जात नाही. दोन्ही नेत्यांनी या भेटीबाबतच्या सुरु असलेल्या चर्चांनांवर स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in