Dipali Sayyad : पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे... - दीपाली सय्यद

ठाकरे गटाच्या महिला नेता दीपाली सय्यद या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे माध्यमांसमोर केले जाहीर
Dipali Sayyad : पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे...
- दीपाली सय्यद

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद या आता ठाकरे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी माध्यमांसमोर येऊन याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंपासून संजय राऊतांवर टीका केली. दीपाली सय्यद यांनी यावेळी म्हंटले की, "संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले." असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.

रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेचे खोके बंद झाल्याची खंत : दीपाली सय्यद

दीपाली सय्यद यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी म्हंटले की, "मुंबई महानगरपालिकेतून येणारे खोके बंद झाले, याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत. या सगळ्यातील महत्त्वाच्या सूत्रधार या रश्मी ठाकरे या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप केला जातो. पण मुंबई महानगरपालिकेतील खोक्यांचे राजकारण नक्की काय आहे, त्यामागील सूत्राधार कोण आहे, या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत. " त्यांनी भविष्यात आणखी काही राजकीय गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मला राजकारणात आणले : दीपाली सय्यद

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, "शनिवारपर्यंत माझा शिंदे गटामध्ये प्रवेश होईल. तो कसा होईल, कुठे होईल याची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी राजकारणात आणि शिवसेनेत आले होते. मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास मी पुर्णपणे तयार आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in