उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'त्या' वादग्रस्त पोस्टरची चर्चा

मुंबईच्या माहिम परिसरात केसरी टूर्स कार्यलायासमोर अज्ञाताने पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास हे पोस्टर लावले आहे
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'त्या' वादग्रस्त पोस्टरची चर्चा

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिमा असेलेले एक वादग्रस्त पोस्टर मुंबईत झळकलं आहे. यात पोस्टवर या दोन्ही नेत्यांसोबत औरंगजेबाचा कथित फोटो आणि वादग्रस्त मजकूर देखील होता. मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ते पोस्टर हटवलं आहे. हे पोस्टर कोणी लावले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मुंबईच्या माहिम परिसरात केसरी टूर्स कार्यलायासमोर अज्ञाताने पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास हे पोस्टर लावले आहे.

पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोस्टर हटवले तरी. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यामांतून या पोस्टरचे फोटो वार्तांकनासाठी वापरण्यात आलेले आहेत. या पोस्टरवर दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेक केला असून त्यावर "औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणसाठी सोबतीला उद्धवचे हुजरे" असा वादग्रस्त मजकूर देखील या पोस्टरवर आहे.
या मजकुराखाली #UddhavThackerayForAurangzeb म्हणजे औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॅशटॅग वापरण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in