एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर घेणार पंकजा मुंडे यांची भेट; राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण

उद्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उपस्थित असणार आहेत.
एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर घेणार पंकजा मुंडे यांची भेट; राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण

भापज नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरु आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उपस्थित असणार आहेत. यावेळी त्यांची पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांनी मी भाजपची नाही तर, भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं+ वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यवरुन भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, "पंकजा मुंडेंनी केलेलं विधान वेदनादायी आहे. त्यांनी ज्या शब्दांत आपली उद्दिग्नता व्यक्त केली आहे ती वेदनादायी आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी आयुष्य घातलं आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे भाजप पक्ष वाढवला, बहुजनांपर्यंत पोहचवला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होत आहे." असा दावा खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे उद्या गोपीनाथ गडावर उपस्थित असणार आहेत. मागील 2-3 वर्षाचा गोपीनाथ गडावरील कार्यक्रमातील घटना महत्वपुर्ण ठरल्या आहेत. एकनाथ खडसेच्या बंडाला देखील याच व्यासपीठाने वाट मोकळी करुन दिली होती. गोपीनाथ गड येथे केलेल्या भाषणात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर काही दिवसांना खडसे यांनी भाजपपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आता उद्याच्या मुंडे- खडसे भेटीने राजकीय विश्वात काय भूकंप होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in